पुणे :
पुण्याचे खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भारतीय जनता पक्षाने (BJP) तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. पक्षाने त्यांची निवडणूक सह-प्रभारी (Co-Incharge) म्हणून नियुक्ती केली आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील नेतृत्वाला दक्षिण भारतात काम करण्याची मोठी संधी मिळाली असून, भाजपाच्या निवडणूक तयारीत नवा उत्साह निर्माण झाला आहे


