भारतातील प्रमुख महानगरांमध्ये — पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद — या दिवाळीत वायू प्रदूषण
भारतातील प्रमुख महानगरांमध्ये — पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद — या दिवाळीत वायू प्रदूषणात झपाट्याने वाढ होण्याचा Indian Institute of Tropical Meteorology (IITM) चा इशारा समोर आला आहे. संस्थेच्या हवामान अंदाजानुसार, फटाक्यांमधून निघणारा धूर, हवेत थंडीमुळे कमी होणारी हवा हालचाल, आणि वाहनांमधून होणारे उत्सर्जन या तिन्ही घटकांच्या संयोगामुळे दिवाळीच्या काळात PM 2.5 आणि PM 10 या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात विशेषतः २० ते २३ ऑक्टोबरदरम्यान हवेत प्रदूषणाचे प्रमाण उच्च पातळीवर जाण्याचा अंदाज आहे. हवेत “स्मॉग” (smog) थर दिसण्याची आणि सकाळी व संध्याकाळी श्वसनास त्रास होण्याची शक्यता अधिक आहे. आरोग्य तज्ञांचा इशारा तज्ञांच्या मते, या कालावधीत श्वसन विकार, दम्याचे रुग्ण, मुले व ज्येष्ठ नागरिक यांनी विशेष काळजी घ्यावी. घराबाहेर पडताना N95 मास्क वापरावा. शक्य असल्यास फटाक्यांचा वापर कमी करावा आणि पर्यावरणपूरक सण साजरा करावा.