पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये ‘स्पेशल  नेत्यांचे प्रवेश

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये ‘स्पेशल नेत्यांचे प्रवेश

पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा रंगतदार बनले आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात (भाजप) १५ प्रभावशाली नेत्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे सर्व नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट आणि अजित पवार गट) तसेच रिपाइंच्या विविध गटांमधून येत असल्याचे सांगितले जाते. या प्रवेशामुळे शहरातील राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात होणार आहे.
अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, स्थानिक स्तरावर सक्रिय आणि मतदारसंघात प्रभाव असणाऱ्या नेत्यांवर भाजपने डोळा ठेवला आहे.
यात माजी नगरसेवक, कार्यकर्ते तसेच काही सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे “विकासाचा अजेंडा आणि संघटन विस्तार” या दोन सूत्रांवर पक्ष काम करत आहे. नव्या नेत्यांच्या प्रवेशामुळे संघटनेला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे
या प्रवेशामुळे महापालिकेतील काही प्रभागांतील राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे. भाजपचे शहराध्यक्ष आणि वरिष्ठ नेते लवकरच या नेत्यांचा औपचारिक प्रवेश सोहळा आयोजित करणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांकडून मिळते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *