इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर यांनी भारतात क्रोमबुक उपकरणांचे उत्पादन सुरू करण्याच्या अमेरिकन तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज ‘Google’ च्या निर्णयाचे स्वागत केले आहे. देशात क्रोमबुकचे उत्पादन करण्यासाठी Google च्या वचनबद्धतेबद्दल जाणून घेतल्यावर आनंद व्यक्त करताना, आयटी राज्यमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ही बातमी दिली.
या बाबतीत ते असेही म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी पुढाकार आणि उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) धोरणांमुळे, भारत वेगाने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास येत आहे. या संदर्भात आयटी हार्डवेअर PLI 2.0 उपक्रमाला विशेष महत्त्व आहे, ज्यामुळे भारतीय भूमीवर लॅपटॉप आणि सर्व्हर निर्मितीच्या शक्यता वाढल्या आहेत.
Google चे CEO, सुंदर पिचाई यांनी Twitter द्वारे याची माहिती दिली. त्यांनी असे लिहिले आहे की, “आम्ही भारतात Chromebook चे उत्पादन सुरू करण्यासाठी HP सह भागीदारी करत आहोत. हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे कारण ते भारतात उत्पादित केलेले पहिले-वहिले Chromebook असेल. या उपक्रमाचा उद्देश भारतीय विद्यार्थ्यांना परवडणारे आणि सुरक्षित संगणक पर्याय उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांची सोय करणे असा आहे.”