काही काळापूर्वी शिवसेनेत ज्या प्रकारे पक्ष आणि पक्षाचे चिन्ह यावरून जो कलगीतुरा रंगला होता तशीच काहीशी परिस्तिथी निवडणूक आयोगासमोर घेऊन आता राष्ट्रवादी पक्ष उभा राहिला आहे. या पक्षाची प्रादेशिक ताकद पाहता या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्टाचे लक्ष वेधून लागले आहे. आज या संबंधात पहिली सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी वकिली करणार असून त्यांनी या संदर्भात सात ते नऊ हजार प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. निवडणूक आयोगात दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे.
विशेष म्हणजे अजित पवार गटाच्या तुलनेत शरद पवार गटाने जास्त प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहेत. अजित पवार गटाने मृत व्यक्तींच्या नावे प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचा आरोप शरद पवार गटातून सुरू झाला आहे. शिवाय, या प्रतिज्ञापत्रांमध्ये अंदाजे ६० सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. अजित पवार गटाच्या तुलनेत शरद पवार गटाने ४००० हून अधिक अतिरिक्त शपथपत्रे जमा केल्याची प्राथमिक माहिती आहे.
दोन्ही गटांचे प्रतिनिधी सुनावणीला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा असली तरी या महत्त्वपूर्ण चर्चेदरम्यान वजनदार नेते दोन्ही गटांचे प्रतिनिधित्व करतील, अशी शक्यता आहे. या सुरुवातीच्या सुनावणीतील उलगडणाऱ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राची उत्सुकता वाढली आहे.