पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते BSNL चं स्वदेशी 4G नेटवर्क राष्ट्राला समर्पित

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते BSNL चं स्वदेशी 4G नेटवर्क राष्ट्राला समर्पित

नवी दिल्ली / ओडिशा :
भारताच्या दूरसंचार क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातील झारसुगुडा येथून BSNL चं पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 4G नेटवर्क राष्ट्राला समर्पित केले.

या प्रकल्पाअंतर्गत देशभरात सुमारे 97,500 मोबाइल टॉवर्स उभारले जाणार असून यासाठी अंदाजे ₹37,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. या नेटवर्कचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दुर्गम व ग्रामीण भागांतील सुमारे 26,700 गावे आता वेगवान इंटरनेट सेवेशी जोडली जाणार आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *