पण ट्रॉफी न स्वीकारल्याने वाद




दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात भारताने एशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर ५ गडींनी मात करत नवा इतिहास रचला आणि नवव्यांदा एशिया कप विजेतेपद पटकावले. मात्र सामन्यानंतरच्या ट्रॉफी वितरण सोहळ्यात भारतीय संघाने ट्रॉफी व पदक स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे मोठा वाद उद्भवला आहे.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना केवळ १४६ धावांतच सर्वबाद झाला.
भारताकडून कुलदीप यादवने ४ विकेट्स, तर बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात भारताची सुरुवात डळमळीत झाली, पण तिलक वर्मा यांनी संयमी आणि आक्रमक खेळ करत नाबाद ६९ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
भारताने १९.४ षटकांतच सामना जिंकत ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
ट्रॉफी स्वीकारण्यास नकार
विजयानंतर पारंपरिक ट्रॉफी आणि पदक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र भारतीय खेळाडूंनी एशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे आंतरिक मंत्री मोहसिन नकी यांच्या हस्ते ट्रॉफी व पदक स्वीकारण्यास नकार दिला.
या निर्णयामुळे संपूर्ण सोहळा गोंधळात पार पडला.अखेरीस ट्रॉफी सादरच करण्यात आली नाही. दोन्ही संघांनी सामन्यानंतरचे पारंपरिक हस्तांदोलन (हँडशेक) देखील टाळले.
