आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन..

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन..

आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक संस्था, शासकीय विभाग तसेच शाळा-कॉलेजांत ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला.
या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाची कदर करणे आणि त्यांच्या हक्क, सन्मान व सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करणे हे आहे. आयुष्यभर समाज, कुटुंब आणि राष्ट्रासाठी काम करून आपल्या अनुभवसंपन्नतेने तरुण पिढीला दिशा देणाऱ्या या वयोवृद्धांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
जागतिक स्तरावरही ‘Active Ageing’ अर्थात आरोग्यपूर्ण, सुरक्षित व आनंदी वृध्दत्वाचा संदेश दिला जात आहे. वृद्धांना सामाजिक, आर्थिक आणि भावनिक आधार मिळावा, त्यांचा सहभाग समाजनिर्मितीत सक्रिय राहावा यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
महाराष्ट्रातही विविध ठिकाणी वृद्धाश्रमांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, तसेच ज्येष्ठांचा सत्कार यांचे आयोजन करण्यात आले. तरुणांनीही आपल्या कुटुंबातील आजी-आजोबा व वडीलधाऱ्यांसोबत वेळ घालवून त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेतला पाहिजे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *