पुणे जिल्हा महा-ई सेवा व आधार केंद्र संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर

पुणे जिल्हा महा-ई सेवा व आधार केंद्र संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर

विजय मोहिते यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

पुणे : पुणे जिल्हा अखिलस्तरीय
महा-ई सेवा व आधार केंद्र संघटनेची जिल्हा बैठक नुकतीच पुण्यात सकारात्मक आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडली. बैठकीत संघटनेची नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करून तालुका पातळीवरील अध्यक्षांना नियुक्तीपत्र वितरण केले गेले, ज्यामुळे संघटनेच्या कार्याला नवी दिशा आणि गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा अध्यक्ष विजय मोहिते यांनी सांभाळले. कार्यक्रमास जिल्हा सचिव भिमराव आठवले, राज्य प्रतिनिधी महाधन उघडे, राज्य संघटक प्रमुख योगेश रांधवण आणि राज्य निरीक्षक अॅड. किशोर अडसूळ यांसह मोठ्या संख्येने नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील कड यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल कुलकर्णी यांनी केले. बैठकीदरम्यान संघटनात्मक बळकटीकरण, डिजिटल पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा पुरवण्याच्या कार्यपद्धतीवर विशेष भर देण्यात आला.
प्रमोद पानसरे आणि राज गायकवाड यांनी केंद्र चालकांना मार्गदर्शन केले आणि केंद्रांमधील कामकाज अधिक परिणामकारक व प्रमाणबद्ध कसे करावेत यावर ठोस सूचना केल्या. त्यांनी नागरिकांना सेवा देताना शिस्तबद्धता, वेळेचे पालन आणि डिजिटल नोंदींची खात्री करण्यावर भर द्यावा असे आवाहन केले.
रायगड जिल्हा तालुका अध्यक्ष समीर कांबळे यांची निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील तालुका पातळीवरील संस्थात्मक कामकाज सुसूत्र करण्यासाठी खालील तालुका अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली – हवेलीः विशाल कुलकर्णी; पुणे शहरः निखिल पालकर; दौंड: किरण काकडे; बारामतीः प्रमोद पानसरे; इंदापूरः प्रदीप ताटे; भोरः सूर्यकांत माने; मावळः अशोक मानकर; शिरूरः उमाकांत पांडे; पुरंदरः दत्तात्रय वाघमारे; जुन्नरः अॅड. संजय उकिर्डे; खेडः संदीप मेदगे; वेल्हाः समीर कांबळे; मुळशीः सुहास शेंडे, लोणी काळभोर अप्परः राज गायकवाड. आंबेगाव व पिंपरी चिंचवड
तालुक्यांसाठी नियुक्त्या लवकरच करण्यात येतील अशी माहिती कार्यक्रमात देण्यात आली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *