आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीत भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला तब्बल ६ विकेट्सने पराभूत केले.पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर साहिबजादा फरहानने दमदार खेळी करत ५८ धावा फटकावल्या. मात्र मधल्या फळीत पाकिस्तानला गती राखता आली नाही आणि ठराविक वेळी गडी गमावल्याने त्यांचा डाव १५५ धावांवर आटोपला.भारताकडून गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. विशेषत: वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला पाकिस्तानला रोखून धरले.भारताच्या डावात सुरुवातीलाच अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी मिळून फक्त सहा षटकांत ६९ धावा कुटल्या. ही भारताची पाकिस्तानविरुद्धची सर्वाधिक पावरप्ले धावसंख्या ठरली. अभिषेक शर्माने तुफानी फटकेबाजी करत केवळ ३३१ चेंडूत आंतरराष्ट्रीय स्तरावरील ५० षटकार पूर्ण केले आणि विक्रम रचला.यानंतर मधल्या फळीत थोडासा गडबड झाली असली तरी तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी संयमी पण आक्रमक फलंदाजी करत भारताला सहज विजय मिळवून दिला.


